Rain update गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राज्यात आजही भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यामध्ये आठ जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
यामध्ये कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
तसेच विदर्भामधील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आज अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे
दरम्यान, भंडारदरात पाऊस सुरू असल्याने वाकी तलावातून वाढलेला विसर्ग तसेच परिसरातील ओढेनाल्यांचे पाणी येत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 24 टक्क्यांवर पोहचला होता. सायंकाळी हा पाणीसाठा 25 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. काल मंगळवारी आषाढसरींचा जोर आणखी वाढल्याने परिसर धुक्यांनी लेपाटून गेला आहे. डोंगरदर्यांवरील धबधबे आक्राळ विक्राळ रूप घेत आहेत. ओढे-नाले भरभरून वाहत असून धरणात विसावत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा गतीने वाढु लागला आहे. संततधार सुरू असल्याने जनजीवन गारठून गेले आहे. भात खाचारं तुडूंब झाले आहेत.भंडारदरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 21 मिमी झाली आहे. वाकीचा ओव्हरफ्लो ही 556 क्युसेकपर्यंत वाढला आहे. पाण्याची आवक पाहता आज या धरणातील पाणीसाठा 65 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
महत्वाची सूचना पहा क्लिक करा
मुळा पाणलोटात सोमवारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने मुळा नदी दुधडी भरून वाहत आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसाने काल मंगळवारी आणखी जोर धरला. यामुळे सकाळी मुळा नदीचा विसर्ग 6951 क्यूसेस होता तर सायंकाळी त्यात वाढ होऊन तो 9155 क्यूसेसवर गेला. मुळा धरणाकडे यामुळे पाण्याची जोरदार आवक सुरू झाली आहे. 26 टीएमसी च्या मुळा धरणाचा साठा 10,264 दशलक्ष घनफूट झाला आहे मुळा धरण धरण रात्री 40% भरले.
आढळा निम्मे
अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यांतील 20 गावांतील लाभक्षेत्राचे सिंचन करणार्या देवठाण येथील आढळा धरण निम्मे भरले आहे. 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सकाळी 531 दलघफू (50 टक्के) झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
दारणा धरण 67 टक्के भरले
24 तासांत पाऊण टीएमसी पाणी दाखल
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सोमवारच्या मुसळधार पावसाने दारणात 24 तासांत नव्याने पाऊण टीएमसी (749 दलघफू) पाणी दाखल झाले. 24 तासांत 56 टक्क्यांवरुन दारणाचा उपयुक्तसाठा 66 टक्क्यांवर पोहचला! भावली 90 टक्क्यांवर पोहचले. गंगापूर 36.82 टक्क्यांवर पोहचले आहे. काल मंगळवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी मध्यम स्वरुपाच्या पावसाची रिपरिप सुरुच होती. मात्र काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत पावसाने दमदार बॅटींग केली. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 123 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 91 मिमीची नोंद झाली. तर दारणाच्या भिंतीजवळ 32, मुकणेला 33, वाकी 59, भाम ला 117, भावलीला 136 मिमी पाऊस झाला.
दारणाच्या पाणलोटातील मुसळधार पावसामुळे दारणात 749 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणाचा साठा 66.53 टक्क्यांवर सकाळी पोहचला. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 4756 दलघफू पाणीसाठा झाला आहे. या हंगामातील 24 तासांतील काल सर्वाधिक पाऊस नोंदला गेला. मुकणे धरणात 147 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. मुकणे 19.38 टक्के भरले आहे. वाकी धरण 18.50 टक्के, भाम 66.27 टक्के, भावली 89.96 टक्के, वालदेवी 31.07 टक्के असे साठे काल सकाळी झाले होते. गंगापूर धरणाच्या पाणलोटातही त्र्यंबकला 84, अंबोलीला 112, गंगापूरला 45, कश्यपीला 57, गौतमी गोदावरी 60, कडवा 15, आळंदी 30 मिमी असा पाऊस नोंदला गेला. गंगापूर मध्ये 24 तासांत 167 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.
1 जून पासून आतापर्यंत या धरणात एक टीएमसी पाण्याची आवक झाली. गंगापूर च्या पाणलोटात अजुन पावसाने फारसे मनावर घेतलेले दिसत नाही. त्या तुलनेत दारणात 1 जून पासुन साडेचार टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली. काल च्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणांचा उपयुक्तसाठा 29.39 टक्क्यांवर पोहचला आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला तो 44.96 टक्के इतका होता.
धरणाचे नाव टक्केवारी
दारणा 66.53
भावली 89.96
गंगापूर 36.82
मुकणे 19.38
वाकी 18.50
वालदेवी 31.07
भाम 66.27
कश्यपी 36.82
गौतमी गोदा. 35.33
कडवा 55.86