पंजाबराव डख यांनी सांगितलं या 13 जिल्ह्यात होणार अति मुसळधार पाऊस.IMD Alert update

IMD Alert update पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे, गडचिरोली जिल्ह्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे, गडचिरोली जिल्ह्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तास राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईमध्ये पुढील 24 तास वातावरण ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

 

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मराठवाडयातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

 

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अस हवामान खात्यानं म्हटलं आहे.

 

आज रत्नागिरी, सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

Leave a Comment