Viral Video : शाळेचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील कधीही न विसरणारे दिवस असतात. शाळेच्या दिवसांमध्ये घडलेल्या अनेक गमती जमती आजही आपल्याला आठवतात आणि आपल्या चेहऱ्यावर अलगद हसू येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपले बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवेल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली भर वर्गात झोपताना दिसत आहे. ती वर्गात बसलेली असताना डुलकी घेताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
भर वर्गात चिमुकलीची झोप सुटेना!
या व्हायरल व्हिडीओ एका वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वर्ग सुरू आहे आणि विद्यार्थी खाली बसलेले आहे. या विद्यार्थ्यांपैकी एका चिमुकल्या विद्यार्थीनीला खूप झोप येते तेव्हा ती डुलकी घेताना दिसते शेवटी डुलकी घेता घेता तिचा तोल जातो. ती खाली पडते आणि तिला जाग येते. त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि व्हिडीओ बनवणारी व्यक्ती पाहून तिला हसू आवरत नाही आणि ती गोड हसताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
sir_avinash_patil86 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “निरागस हास्य” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “देवाने पृथ्वीतलावर निस्वार्थी आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी घेतलेल एक छोटस निरागस रूप म्हणजे बालपण…” तर एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी… खऱ्या स्वर्गाचा आनंद बालपणीच असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “खुप छान आहे चिमणी.. किती गोड हसते” एक युजर लिहितो, “आम्ही ही असेच झोपायचो शाळेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी कमेंटमध्ये त्यांच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत. सोशल मीडियावर असे अनेक शाळेतले व्हिडीओ व्हायरल होत असतात. युजर्स या व्हिडीओंवर भरभरून प्रतिसाद देताना दिसतात.