PUNE MONSOON पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे, गुरुवारी पुण्यात पावसानं गेल्या 32 वर्षांचा रेकॉर्ड तोडला, दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे, गुरुवारी पुण्यात पावसानं गेल्या 32 वर्षांचा रेकॉर्ड तोडला, त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास 127 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थालंतरीत करण्यात आलं.
अशी ऐक महत्वाची माहिती पहा क्लिक करून
पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं, अतिमुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये सात जणांना आपला जीव गमावावा लागला. तर एकजण जखमी, तर दोनजण दरडीखाली सापडल्याने अद्यापही बेपत्ता आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे शहरात तिघांचा विजेचा धक्का बसल्याने, तर दोनजण बुडून मरण पावले आहेत. मुळशी तालुक्यातील आदरवाडी येथे डोंगराचा कडा कोसळल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. एकाचा इंद्रायणी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला.
दुसरीकडे लवासा सिटीमध्ये दोन बंगल्यावर दरड कोसळल्याची देखील घटना घडली आहे, या घटनेत दोन जण ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पुण्याला मुसळधार पावसानं तडाका दिला या घटनेत पुणेकरांचं मोठं नुकसानं झालं आहे, अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. अनेक कुटुंब बेघर झाले आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामानखात्याकडून पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 तासांमध्ये पावसाला सुरुवात होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
दुसरीकडे मुंबई, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.