Maharashtra Weather राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain) चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून महत्त्वाची सूचना पहा क्लिक करून
आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, ९ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वारणा नदी बरोबरच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटांजवळ पोहोचली आहे.
मुसळधार पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
काही भागात जोरदार पावसामुळं शेती पिकांचं देखील नुकसान झालं आहे.
राज्याच्या विविध भागात आजही पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे